किल्ले सांकशी
दिनांक : १६/०७/२०१७
आरंभ स्थान : पनवेल
पनवेल रेल्वेस्थानकापासून १० मिनिटांवर एस् टी बसस्थानक आहे तिथून पेणला जाणारी सका. ९:०० वा. ची बस पकडावी (१ तास). पेणला जाऊन बसस्थानका समोरील राधिका हॉटेलात नाश्ता करू शकता. पेणवरून सका. १०:४५ वा. ची मुंगोशिला जाणारी बस पकडावी व मुंगोशिला शाळेजवळ उतरावे (१५ मि.). इथून पुढे चालत बद्रुद्दिनच्या दर्ग्या पर्यंत यावे (अर्धा तास). तिथे शौकत नामक व्यक्तीच कुटुंब राहत त्यांच्याकडे चहा-नाश्ता व दुपारच्या जेवणाची ऑर्डर देऊ शकता (मो.नं. ९७६७६२१९२३ / ७५१७७१४६४३). दर्ग्याच्या डव्याबाजुने गडावरून पाण्याच्या टाक्यांमधून एक छोटी लोखंडी पाइपलाईन दर्ग्यापर्यंत आणलेली आहे त्या पाईपच्या दिशेने वर जाणाऱ्या पायवाटेने गडावर चढावे (३० मी). मध्ये दोन ठिकाणी मार्ग निसरडा आहे नवख्या डोंगरयात्रींसाठी रोप आवश्यक. गडमाथ्यावरून उत्तरेस कर्नाळा किल्याचा सुळखा लक्ष्य वेधतो, तर पुर्वेस माणिकगड दिसतो, पश्चिमेस पाताळगंगा नदी सिंधुसगरास मिळताना दिसते. गडाच्या सखल बाजूस पाण्याची टाकी आहेत तर उंच बाजूस निशाण आहे. निशाणाच्या जरा पुढे खाली उतरल्यावर अजून एक पण्याच टाक आहे. गडावर दोन तास आरामात जातात. परत निघताना मुंगोशी शाळेजवळून संध्या. ३:१५ वा. ची पेण एस् टी पकडावी व तिथून पनवेलला जाणारी एस् टी पकडावी अथवा पेण डेपोतून चालत पेण रेल्वेस्थानक गाठावे (१५ मी.) संध्या. ४:४४ वा. ची रोहा-दिवा डेमु ट्रेन पकडावी व पनवेलला उतरावे (१ तास). किंवा बद्रुद्दिन दर्ग्यापासून मुंगोशीच्या दिशेने जाताना उजव्या बाजूस एक कच्चा मार्ग बलवलीला जातो त्या मार्गाने मुंबई-गोवा महामार्गावर चालत जावे (१ तास) व तिथून पनवेल ला जाणारी एस् टी पकडावी (१ तास) किंवा बलवली वरून चालत हमरापुर रेल्वेस्थानक गाठावे, (अर्धा तास) तिथे पॅसेंजर ट्रेन थांबते.
दिनांक : १६/०७/२०१७
आरंभ स्थान : पनवेल
![]() |
| Sankashi Fort-Google map किल्ले सांकशीला जाणारी पायवाट |

No comments:
Post a Comment